अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत शनिवारी अकरा रुग्णांचा दुर्दवी मृत्यू झाला तर सहारुग्णांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक मंत्री, स्थानिक खासदार,आमदार, विविध पक्षाचे नेत्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. ही चौकशी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या वतीनेही चौकशी होणार असून त्याचा अहवाल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मालवीय यांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर स्पष्ट केले आहे. तसेच स्थानिक तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत आईपीसी 304-अ नुसार अज्ञातानं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यादृष्टीने तपास करणार आहे.
बहुतांशी रुग्ण वयोवृद्ध-
काल शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला अचानक आग लागून संपूर्ण वार्डात मोठा धूर पसरला. यावेळी या आयसीयू सतरा कोरोना रुग्ण उपचार घेत होते. यातील अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. एक रुग्ण वगळता इतर सोळा रुग्ण हे पन्नास-साथ वर्षांवरील होते. यातील चार महिला तर सात पुरुष रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मृतात एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही. दहा जणांचे मृत्यू हे धूर आणि सफोकेशन मुळे झाले आहेत. तर एकाच आगीत जळल्याने झाला आहे. मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषित केली आहे.
दिवसभर मंत्र्यांचा पाहणी दौरा-