महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरला मुसळधार पावसाने झोडपले, रस्ते जलमय... - ahamadnagar

अहमदनगरमध्ये वादळीवाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराला काही मिनिटातच ओलेचिंब केले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.

नगरला धुवादार पावसाने झोडपले, रस्ते जलमय...

By

Published : Jun 13, 2019, 10:10 PM IST

अहमदनगर -राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. त्याच प्रमाणे गुरुवारी सांयकाळी शहरातदेखील जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळीवाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराला काही मिनिटातच ओलेचिंब केले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.


विजेचा कडकडाटासह शहरात जोरदार पाऊसझाला. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे रूप आले आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

नगरला धुवादार पावसाने झोडपले, रस्ते जलमय...


दरम्यान, आज पडलेल्या जोरदार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक या सुखद वातावरणाचा आनंद घेत आहेत. दीड-दोन तासांच्या पावसानंतर सूर्य-नारायणाने अस्ताला जाण्यापूर्वी दर्शन दिले. यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. ऊन-पावसाचा हा खेळ डोळ्यात साठवण्यासारखा मनमोहक होता. मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मान्सून पावसाच्या आगमनाची आस सर्वांनाच लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details