महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lucky Draw For Vaccinators : लस घेणाऱ्यांसाठी 'लकी ड्रॉ'चे आयोजन.. मिळणार टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंख्यासारखी बक्षिसे - Covid Vaccine First Dose

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड पंचायत समितीने (Jamkhed Panchayat Samiti) कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. लस घेणाऱ्या नागरिकांसाठी 'लकी ड्रॉ'चे आयोजन (Lucky Draw For Vaccinators) करण्यात आले असून, लकी ड्रॉमध्ये नाव आल्यास विविध प्रकारची बक्षिसे नागरिकांना मिळणार आहेत.

लसीकरण करणाऱ्यांसाठी 'लकी ड्रॉ'
लसीकरण करणाऱ्यांसाठी 'लकी ड्रॉ'

By

Published : Dec 15, 2021, 1:11 PM IST

Updated : Dec 15, 2021, 10:33 PM IST

अहमदनगर- जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचे ७२ टक्के लसीकरण पूर्ण झालेले (Covid Vaccination Jamkhed) आहे. परंतु अद्यापही २८ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस (Covid Vaccine First Dose) घेतलेला नाही. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लस घेण्याबाबत गैरसमज दिसून येतात. प्रशासन लसीकरणाबाबत असलेले गैरसमज (Covid Vaccination Misapprehension) दूर करून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला म्हणावे तेवढे यश मिळत नाही. त्यामुळे पंचायत समिती जामखेडने (Jamkhed Panchayat Samiti) एक आगळा वेगळा उपक्रम १०० टक्के लसीकरण होण्यासाठी राबवलेला आहे.

लस घेणाऱ्यांसाठी 'लकी ड्रॉ'चे आयोजन.. मिळणार टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंख्यासारखी बक्षिसे
पहिला डोस राहिलेल्या नागरिकांना प्रोत्साहनज्या नागरीकांचा लसीचा पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी, लस घेतल्यास त्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास ४२ बक्षिसे जिंकण्याची संधी (Lucky Draw For Vaccinators) आहे. पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी लोकसहभागातून ही बक्षीस योजना सादर केलेली आहे.12 ते 24 डिसेंबर योजनेचा कालावधी12 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत लसीकरण करून घेणाऱ्यांना (फक्त पहिला डोस) ही संधी उपलब्ध आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती जामखेड येथे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत आयोजित करण्यात आलेली आहे.लसवंतांना अशी आहेत बक्षिसे-प्रथम बक्षीस- फ्रीज, -द्वितीय- पिठाची गिरणी, -तृतीय- एलईडी टीव्ही, -चतुर्थ- पंखा-५, -पाचवे- मिक्सर ५, -सहावे- कुकर ५, -सातवे- इस्त्री ५, -आठवे- टिफिन २० अशी एकूण ४३ बक्षिसे दिली जाणार आहेत. या उपक्रमासाठी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar), सभापती राजश्री मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे, पंचायत समिती सदस्य सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. सुभाष आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे, सोमनाथ पाचारणे यांनी मदत केली.शासनाचा उपक्रम नाही, निधीही नाही राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी कंबर कसली असून, विशेष करून ग्रामीण भागात लसीकरणास निरुत्साह असल्याने स्थानिक आमदार, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना पुढाकार घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड पंचायत समितीने पुढाकार घेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनी वर्गणी करत ही लकी ड्रॉची योजना आखली आहे. अशा योजनेसाठी शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याचे आणि निधी नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र लसीकरणास जनतेकडून प्रतिसाद मिळाला आहे. लोकसहभागातून ही योजना असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (IAS Rajendra Bhosale), मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (IAS Rajendra Kshirsagar), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे (DHO Dr Sandeep Sangale), उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचा लाभ घेऊन सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आव्हान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी केले आहे.
Last Updated : Dec 15, 2021, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details