अहमदनगर- पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या पहिल्या टप्प्यात सुरू होणारे व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोरोना नियम पाळावेत असे आवाहनही पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. जर पुन्हा करोना रुग्ण आढळून आले तर आढावा घेऊन निर्बंध पुन्हा कडक केली जातील, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
सदावरतेंचे भाजप कनेक्शन आहे का
पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या पहिल्या टप्प्यात सुरू होणारे व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहेत.
सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे की गुढी उभारून हा दिन साजरा करायचा आहे. आता यात सदावर्ते यांना आक्षेप असायचे काय कारण आहे, छत्रपतींचा गौरव करणे हे चुकीचे वाटते का कुणाला. मराठा समाजातील गरीब मुलांचे शिक्षण, नोकरीतील संधी याबद्दल सदावर्ते उच्च न्यायालयात गेले आहेत, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या माजी मंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात न्यायालयात गेल्या. कुठे तरी यामागे हे भाजप कनेक्शन आहे का, असा वास येत असल्याची शंका मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.
नियम पाळा अन्यथा पुन्हा कडक लॉकडाउन
कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. गेले अनेक दिवस राज्यात कडक लॉकडाउन आहे. नागरिक, व्यापारी, नोकरदार, हातावर पोट असणारे या सगळ्यांची अडचण झाली होती. कडक लॉकडाउनमुळे आता पाच वर्गीकरण करून, सोमवार पासून लॉकडाउन मोकळा करत आहोत. मात्र, नागरिकांना नियम हे पाळावेच लागतील. पॉझिव्ह रेट वाढला आणि ऑक्सिजन बेड कमी पडू लागले, तर पुन्हा कडक लॉकडाउन अटळ आहे. यासाठी सर्वांनी काळजी घेत सुरक्षितता पाळली पाहिजे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.