अहमदनगर - जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिली जाणारी कोरोना मृत्यूंची आकडेवारी आणि प्रत्यक्षात अमरधाममध्ये होणाऱ्या अंतविधीच्या आकडेवारीत तफावत येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि राजकीय पक्षांकडून होत आहे.
कोरोना मृत्यूसंख्या लपवत असल्याच्या आरोपाचे अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून खंडन - अहमदनगर
अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिली जाणारी कोरोना मृत्यूंची आकडेवारी आणि प्रत्यक्षात अमरधाममध्ये होणाऱ्या अंतविधीच्या आकडेवारीत तफावत येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि राजकीय पक्षांकडून होत आहे.
![कोरोना मृत्यूसंख्या लपवत असल्याच्या आरोपाचे अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून खंडन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11426739-195-11426739-1618574204591.jpg)
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी खुलासा केला, शासकीय रुग्णालयातील आकडेवारी त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड असते. त्याप्रमाणे ती प्रसारित होते. मात्र अनेक खासगी कोविड रुग्णालये त्याच दिवशी कोरोना मृत्यूची माहिती शासकीय संबंधित पोर्टलवर अपलोड करत नसल्याने ही तफावत येते. त्यामुळे कधी जास्त मृत्यू असताना कमी संख्या दिसते तर उशिराने अपलोड केल्यामुळे एखाद्या दिवशी कमी मृत्यू असताना आकडेवारी जास्त दिसते, असे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल पोखरणा यांनी दिले आहे.
हेही वाचा-देशात तब्बल २ लाख १७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १,१८५ मृत्यू