अहमदनगर- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल १०२ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, या रुग्णवाढीची चर्चा सुरू होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने एक व्हिडिओ केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी रविवारी चाळीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पोर्टलवर जुन्या नोंदी अपलोड केल्याने ही रूग्णसंख्या फुगली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, यातून जिल्हा प्रशासन, मनपा-शासकीय आरोग्य विभाग आणि खासगी कोविड हॉस्पिटल यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात रविवारी मोठी रुग्णवाढअहमदनगरमध्ये सरासरी रोज 40 मृत्यू
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल १०२ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, या रुग्णवाढीची चर्चा सुरू होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने एक व्हिडिओ केला आहे.
डॉ. राजेंद्र भोसले
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नव्याने 3 हजार ५९२ रुग्णांत वाढ झाली आहे. एकाच दिवशी रुग्णसंख्या वाढीतील हा उच्चांक आहे. रुग्णसंख्या रोजच वाढत असली तरी खाटा, ऑक्सिजन,आयसीयू बेड, रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जानवत आहे.
चोवीस तास अमरधाममध्ये पेटतायेत चिता
नगर जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसातील मृतांच्या आकड्यांनी उच्चांक गाठला आहे. सरासरी रोज ४५ ते ५० जणांचा मृत्यू होत आहे. एकूणच नगरमधील अमरधामात चोवीस तास चिता जळताना दिसून येत आहेत.
दुसरा ट्रेंड अधिक घातक, काळजी घ्या
संपूर्ण देशातच कोरोनाने कहर केला आहे. तीच परस्थिती नगर जिल्ह्यातही आहे. सध्या जिल्ह्यात रोज तीन हजारांच्या पुढे कोरोनारुग्णांची नव्याने नोंद होत आहे. या रूग्णसंख्येत बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. या दुसऱ्या लाटेत पूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी आहे. त्यामध्येच कोरोनाच्या दुसऱ्या ट्रेंडमध्ये दिसणारा विषाणू अधिक घातक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार दुप्पट वेगाने वाढत असून रुग्णांना होणारा त्रास अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. परिणामी अनेक रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसीविर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरची गरज पडत आहे.