महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CoronaVirus: संगमनेरमध्ये चार नवे कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील आकडा पोहोचला ६६ वर - ्हमदनगर कोरोनाबाधित रुग्ण

संगमनेर तालुक्यात नव्याने चार कोरोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ahmednagar district corona positive cases
संगमनेरमध्ये चार नवे कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 20, 2020, 9:39 AM IST

अहमदनगर-संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण नाशिक येथे बाधित आढळून आलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे, तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा नगर येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून २६ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे तिघे बाधित आढळून आले. बाधित आढळलेली ५७ वर्षीय महिला ही नाशिक येथे बाधित आढळलेल्या रुग्णांची नातेवाईक असून दुसरा ५२ वर्षीय व्यक्ती हा संगमनेर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. सध्या, नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील असून त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना तिकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

आतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्ती बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details