अहमदनगरकोरोना व्हायरसच्या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी संचारबंदी आदेश लागू झाला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सोमवारी सायंकाळपासून स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईस सुरुवात केली आहे.यावेळी मोकाट फिरणाऱयांना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद देण्यात आला. काहींना तर रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितले.
श्रीगोंद्यात मोकाट फिरणाऱ्या हिरोंना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद; कोरोनाबाबत प्रशासन यंत्रणा अलर्ट - अहमदनगर श्रीगोंदा कोरोना
नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश असतानाही काही परिस्थितीचे गांभीर्य नसलेले लोक दुचाकीवरून फिरत होतो. यात युवावर्गाची संख्या जास्त होती.
श्रीगोंद्यात मोकाट फिरणाऱ्या हिरोंना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद
नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश असतानाही काही परिस्थितीचे गांभीर्य नसलेले लोक दुचाकीवरून फिरत होतो. यात युवावर्गाची संख्या जास्त होती. त्यामुळे तहसीलदार माळी यांनी कडक भूमिका घेत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. यानंतर पोलिसांनी या रस्त्यावर फिरणाऱ्या हिरोंना चांगलेच झिरो बनवले. अनेकांना काठीचा प्रसाद देण्यात आला तर अनेकांना भररस्त्यात उठाबशा काढायला सांगितल्या.
Last Updated : Mar 24, 2020, 9:14 AM IST