महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Folding Staircase The House: अहमदनगरच्या कारागीराचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून कौतुक - अहमदनगर येथील जिन्याचे कारागीर

शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनवलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतूक थेट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. ( Folding Staircase The House ) याबाबत महिंद्रा त्यांनी एक ट्विट केले आहे.

फोल्डिंग जिना
फोल्डिंग जिना

By

Published : Jul 17, 2022, 5:08 PM IST

Updated : Jul 17, 2022, 7:35 PM IST

अहमदनगर - शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनवलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतूक थेट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. ( Folding Staircase ) याबाबत महिंद्रा त्यांनी एक ट्विट केले आहे. दरबार फेब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत हा फोल्डिंग जिना बनवला आहे. जो जिना फोल्ड करून भिंतीला लावतो येतो. त्यामुळे जेंव्हा जिण्याचा वापर करायचा असेल तेंव्हाच तो जिना काढता येतो, इतरवेळी तो भिंतीला लॉक करता येतो.

कारागीर समीर बागवान माहिती देताना

आपल्याला आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली - हा जिना बनविल्यानंतर समीर बागवान यांनी त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला, जो आनंद महिंद्रा यांनी पहिला. तो व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून पोस्ट करत या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. तर, या व्हिडिओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया दरबार फेब्रिकेशनचे समीर बागवान यांनी दिली आहे.

हेही वाचा -Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं

Last Updated : Jul 17, 2022, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details