अहमदनगर - नगर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच थोरातांनी ससाणेंना जिल्हाध्यक्ष केले होते.
नगरमध्ये विखेंचा थोरातांना धक्का; काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणेंचा राजीनामा
नगर काँग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे आपल्या जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज मोठी राजकीय घडामोडी झाली आहे. २० दिवसापूर्वी बाळासाहेब थोरातांनी जिल्हाध्यक्ष केलेल्या करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी श्रीरामपूर येथे ससाणे समर्थकांचा राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. त्यात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचे काम न करण्याची कार्यकर्त्यांनी भुमिका मांडली होती. करण ससाणे यांच्या राजीनाम्यामागे बाळासाहेब थोरात आणि विखे यांच्या राजकीय वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पदाचा राजीनामा दिला असून, शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंचे काम न करण्याची भुमिका घेतली आहे.