अहमदनगर -मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा चर्मकार विकास संघाकडून निषेध नोंदविण्यात आला. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. राजगृहावर हल्ला करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करुन, या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केली.
चर्मकार विकास संघाकडून राजगृह हल्ल्याचा निषेध; महाराष्ट्रात जातीयवाद उफाळला असल्याचा आरोप
कोरोनाच्या संकट काळात राज्यात दलितांवर हल्ले वाढले असून हे चिंताजनक आहे. दोषींवर कडक कारवाईचे करण्याचे आदेह गृह विभागाने पोलिसांना द्यावेत. मुंबई येथील राजगृहावरील फरार हल्लेखोराला तातडीने शोधून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोनाच्या संकट काळात राज्यात दलितांवर हल्ले वाढले असून हे चिंताजनक आहे. दोषींवर कडक कारवाईचे करण्याचे आदेह गृह विभागाने पोलिसांना द्यावेत. मुंबई येथील राजगृहावरील फरार हल्लेखोराला तातडीने शोधून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हल्ला करणारे आणि यामागे ज्यांनी हे षढयंत्र रचले त्यांनाही शोधले पाहिजे.
राज्यात शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर अजून कारवाई झालेली नाही. राज्यात इतरही अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले होत आहेत. कोरोनाच्या काळात होणाऱ्या या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी खामकर यांनी केली आहे.
यावेळी बलराज गायकवाड, अर्जुन कांबळे, गाडे महाराज, लता वाघमारे, संतोष वाघमारे, प्रतिज्ञा वाघमारे, आशा गायकवाड आदि उपस्थित होते.