अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (रविवार) सेवा सप्ताहाचे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गावपातळीवरील सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात उद्यापासून सेवा सप्ताहाचे आयोजन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्र सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (रविवार) सेवा सप्ताहाचे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गावपातळीवरील सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गावपातळीवरील कोरोना योद्धांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान, आरोग्य विषय सामाजिक उपक्रमांचे आयोजन, गरजू व्यक्तींना रेशन किटचे वितरण तसेच आरोग्य विषयक उपाययोजनांसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. म्यूकरमायकोसिस आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना संकटात फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, महसूल आणि पोलीस विभागातील कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करिक आहेत. त्यांच्या कार्याची कृतज्ञता या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने व्यक्त करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केले आहे. त्यानुसार जिल्हाभरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवाभावी उपक्रमातून जनतेपर्यंत जाणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.