संगमनेर (अहमदनगर) Accident on Nashik Pune Highway : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री भीषण अपघात झालाय. अतिशय भीषण पद्धतीनं घडलेल्या या घटनेत धावता ट्रक बाजूनं चाललेल्या कारवर कोसळल्यानं कार मधील चौघांचा मृत्यू झालाय. या अपघातात एक महिला बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
कसा झाला अपघात : नाशिकच्या दिशेनं निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अचानक हा ट्रक त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं मदत कार्य सुरू केलं. त्यामुळं एका महिलेचा जीव वाचला. मात्र, एका दोन वर्षीय चिमुकल्या मुलीसह चार जणांचा या अपघातात बळी गेला. या अपघातात ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीनं वाचविण्यात यश आलंय. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओव्हरटेक करताना धावत्या कारवर कोसळला ट्रक; भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू - Accident on Nashik Pune Highw
Accident on Nashik Pune Highway : पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातातील कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय.
![ओव्हरटेक करताना धावत्या कारवर कोसळला ट्रक; भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू Accident on Nashik Pune Highway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-12-2023/1200-675-20293252-thumbnail-16x9-accident-on-nashik-pune-highway.jpg)
Accident on Nashik Pune Highway
Published : Dec 18, 2023, 7:10 AM IST
माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल : या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळं नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या अपघातानंतर संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरलीय.
हेही वाचा :