अहमदनगर- मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शनी-शिंगणापूरजवळ ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी - अहमदनगर
मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आबह
अहमदनगर
जखमींना तातडीने उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदशनाखाली ऐ.पी.आय जयंवत सिरसाठ पो.काॅ संजय शिंदे, पो.ना आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. नगर-मनमाड रस्त्यावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.उशीरापर्यंत वाहतूक पोलीस वाहनांना मार्ग काढून देत होते.
Last Updated : May 26, 2019, 8:09 PM IST