महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात सापडला अहीर मासा - ​​Jayakwadi dam

औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेला, दुर्मिळ असा अहीर मासा जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरच्या रामडोह येथे मासेमारी करत असलेल्या युवकांच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. हा मासा सुमारे साडेचार फुट लांब व सव्वा पाच किलो वजनाचा आहे. हा मासा आठ वर्षानंतर नेवासा तालुक्याच्या हद्दीत आढळला आहे.

जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात सापडला अहीर मासा
जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात सापडला अहीर मासा

By

Published : Aug 6, 2021, 4:07 PM IST

अहमदनगर (नेवासा) - खवय्यास हवाहवासा असणारा व औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेला, दुर्मिळ असा अहीर मासा जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरच्या रामडोह येथे मासेमारी करत असलेल्या युवकांच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. हा मासा सुमारे साडेचार फुट लांब व सव्वा पाच किलो वजनाचा आहे. हा मासा आठ वर्षानंतर नेवासा तालुक्याच्या हद्दीत आढळला आहे.

जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात सापडला अहीर मासा, त्याबाबत बोलताना, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले

जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात सापडला मासा

नेवासा तालुक्यातील रामडोह येथील विलास भाऊसाहेब परसय्या हे सकाळी पाच वाजता नेहमी प्रमाणे मासे धरण्यासाठी जायकवाडीच्या बॅक वाॅटर मध्ये गेले होते. त्यांनी मासे पकडण्याचे पहीलेच जाळे टाकले होते.अर्ध्या तासाने त्यांनी जाळे ओढण्यास सुरुवात केली, तेव्हा या जाळ्यात पाच सहा चिलापी जातीच्या माशाबरोबरच एक अहीर मासा अडकला होता. परसय्या यांनी चार-पाच मित्रांच्या मदतीने जाळे नदीच्या बाहेर काढले.

आठ वर्षांपूर्वी सापडला होता मासा

औषधी व दुर्मिळ अहीर मासा सापडल्याचे समजताच नदीच्या काठावर बघ्यांची गर्दी जमा झाली होती. येथे रोज पन्नासहून अधिक युवक मासेमारीसाठी येत असतात. त्यांना चिलापी, रावस, मरळ, बळू, कतलासह इतर जातीचे लहान-मोठे मासे मिळतात. आठ वर्षांपूर्वी तेजीराम परसय्या यांना तीन किलो वजनाचा अहीर मासा सापडला होता. त्यानंतर प्रथमच हा मासा नेवासा तालुक्याच्या हद्दीत सापडला आहे.अशी, माहिती रामडोहचे सरपंच ज्ञानेश्वर बोरुडे यांनी दिली.

चार ते सात हजार रुपये किलोचा भाव

हा मासा पाण्याच्या तळाला रेती किंवा चिखलात राहतो. तोंडापासून शेपटीपर्यंत तो सतत चिकट स्राव सोडत असतो. हातात येवूनही तो यामुळे सहज निसटून पुन्हा पाण्यात जातो. असे असताना परसय्या व अन्य चार युवकांनी मासा शिताफीने पकडून काठावर आणला. त्याच्या अंगावरील चिकट द्रवसुध्दा औषधी आहे. दुर्मिळ असलेला अहीर मासा चार ते सात हजार रुपये किलोच्या भावाने सहज विकला जातो. परदेशातही त्यास मोठी मागणी असते, अशी माहिती जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details