महाराष्ट्र

maharashtra

'विल्सन डॅम'ऐवजी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नाव द्या, जागतिक आदिवासी दिनी आंदोलन

By

Published : Aug 10, 2021, 7:02 PM IST

Updated : Aug 10, 2021, 7:18 PM IST

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या नामंतरणासाठी जागतिक आदिवासी दिनी (9 ऑगस्ट) माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात नामांतरण आंदोलन करण्यात आले.

आंदोलनक
आंदोलनक

अकोले (अहमदनगर) - तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या नामंतरणासाठी जागतिक आदिवासी दिनी (9 ऑगस्ट) माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात नामांतरण आंदोलन करण्यात आले. भंडारदरा धरणावर आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे बॅनर झळकावून प्रतिकात्मक नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यासाठी आग्रही असतील तर आदिवासी समाजाचे दैवत आणि आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नाव धरणाला देण्यासाठी समस्त आदिवासी समाज आग्रही का नको, असा सवाल पिचड यांनी उपस्थित केला आहे.

बोलताना वैभव पिचड व मधुकर पिचड

1926 साली भंडारदरा धरणाचे काम पूर्ण झाले. धरणाचे बांधकाम करणारा तत्कालिन ब्रिटिश अभियंता विल्सनच्या नावाने धरणाला 'विल्सन डॅम' म्हणून ओळखले जाते. विल्सन डॅमऐवजी धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे या मागणीसाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नामांतरणासाठी आंदोलन करण्यात आले. धरणावर 'राघोजी भांगरे धरण' असे बॅनर झळकावत आंदोलन करण्यात आले. नामांतरणासाठी आमचा लढा सुरूच ठेवू कितीही गुन्हे दाखल झाले तरी पर्वा नाही, असा आक्रमक पावित्रा माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतला.

पत्रव्यवहार केले मात्र सरकारडून प्रतिसाद नाही

मागील चार महिन्यांपासून राज्य सरकारला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नामांकरण आंदोलन करण्याची वेळ आदिवासी समाजावर आली. शेवटपर्यंत पाठपूरावा करून धरणाला राघोजी भांगरे यांचे नाव देण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असे वैभव पिचड म्हणाले.

हेही वाचा -साईनगरीत साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात

Last Updated : Aug 10, 2021, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details