शिर्डी- गेल्या 47 वर्षापासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी निधी मिळूनही काम रखडले आहे. कालव्याचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी आज (सोमवार) निळवंडे कृती समितीने संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील सतत दुष्काळ सोसणाऱया 182 गावांसाठी वर्ष 1970 मध्ये निळवंडे धरणाचे काम सुरू झाले. कासवगतीने सुरू असलेल्या या धरणाच्या राजकारणावर अनेक नेते प्रस्थापित झाले. मात्र, अजुनही धरणाचे काम काही केल्या पुर्ण झाले नाही. सहा महिन्यापुर्वी केंद्राकडून आणी राज्य सरकारकडून कालव्यांसाठी निधी मंजूर झाला होता. निवडणूक तोंडावर येताच सरकारने ढांगाढोंगात रखडलेल्या कालव्याचे कामही सुरू केले, मात्र अकोले तालुक्यातील सरकारने संपादित केलेल्या जमिनीवर उघडे कालवे होवू देणार नाही, ही भुमिका घेत राष्टवादीचे आमदार वैभव पिचड यांनी काम बंद पाडले.