अहमदनगर- नगर शहरातून जाणारे विविध बायपास रस्त्यावरील चौक हे मृत्युचे सापळे झाले आहेत. दिशादर्शक फलक नसल्याने तसेच गतिरोधक नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात आत्तापर्यंत झाले आहेत. यात अनेकांचे प्राण तर, अनेकजण अपंगही झाले आहेत. याची सर्वात जास्त झळ या बायपास रोड चौकाच्या नजीक असलेल्या विविध गावातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यांचा वावर या ठिकाणाहून दिवस-रात्र होत असतो. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
नगरमधील बायपास रोड बनलेत मृत्युचे सापळे; विविध मागण्यांसाठी संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको - नेप्ती बाईपास
अनेकदा गावातील ग्रामस्थांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज करूनही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना होत नसल्याचा निषेध म्हणून आज (मंगळवार) नेप्ती, निंबळक, निमगाव वाघा, चास येथील ग्रामस्थांनी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
अनेकदा गावातील ग्रामस्थांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज करूनही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना होत नसल्याचा निषेध म्हणून आज (मंगळवार) नेप्ती, निंबळक, निमगाव वाघा, चास येथील ग्रामस्थांनी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी गतिरोधक आणि मार्गदर्शक फलक बसवण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
यानंतर प्रशासनाच्यावतीने आंदोलकांना लवकरच गतिरोधक बसवले जातील, तसेच मार्गदर्शक फलक लावले जातील आणि विविध उपाययोजना या चौकांमध्ये केल्या जातील, याचे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज इंडियन कॉलेजची विद्यार्थिनी गेल्या आठवड्यातच या ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडली होती. तसेच जवळपास पंधरा विद्यार्थी आत्तापर्यंत या ठिकाणी अपघातामध्ये जखमी झालेले आहेत.