महाराष्ट्र

maharashtra

राहुरी अत्याचार प्रकरण: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्ता रोको

By

Published : Jan 12, 2020, 7:57 AM IST

13 वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केला होता. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तो अनेक दिवसांपासून फरार होता. या आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलन
आंदोलन

अहमदनगर -राहुरी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी महेश चाचरला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करत करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्ता रोको


13 वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केला होता. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, तो अनेक दिवसांपासून फरार होता. शनिवारी मध्यरात्री राहुरी पोलिसांनी महेश चाचरला अटक केली. शाळेचा संस्थाचालक आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केला. त्यामुळे या संस्था चालकावर कारवाई करण्यात यावी, यासाठी नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट : एनडीआरएफमार्फत बचावकार्य सुरू, पालकमंत्र्यांनी दिली घटनास्थळी भेट..

प्रविण लोखंडे, यमुना भालेराव, बाळासाहेब जाधव, जालिंदर घिगे, अरुण साळवे, अंकुश बर्डे, बबन साळवे, दिपक त्रिभुवन, संजय संसारे, किरण साळवे यांच्यासह रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details