शिर्डी- नगर-मनमाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या अचचणी निर्माण होत आहेत. वारवांर मागणी करूनही हा महामार्ग दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर या रस्त्यातील खड़्डे बुजवण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नगर-मनमाड रस्ता कृती समितीच्यावतीने रस्त्यातील खड्ड्यात बसून मुंडन आंदोलन केले.
नगर-मनमाड रस्त्याची दूरवस्था; खड्ड्यात बसून युवकांनी केले मुंडन आंदोलन - युवकांचे मुंडण आंदोलन
नगर मनमाड रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठत असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर नगर-मनमाड रस्त्यातील खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
नगर-मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन सातत्याने काना डोळा करत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठत असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर नगर-मनमाड रस्त्यातील खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या कारभारावर टीका केली. तसेच रोडवर पडलेल्या खड्ड्यात बसून युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडन आंदोलन केले.
यावेळी वसंत कदम, प्रमोद विधाटे, सचिन तारडे, आशपाक सय्यद, अनिल वाणी, प्रभाकर खांदे, अजिंक्य कोळगे, नितीन मोरे आदींनी मुंडन केले तर क्रांतिसेना पक्ष, मराठा एकीकरण समिती, मनसे राहुरी फॅक्टरी, संघर्ष चालक मालक संस्था, स्वराज्य चालक मालक संघटना, प्रहार चालक मालक संघटना, छावा संघटना, नाभिक संघटना राहुरी फॅक्टरी, वाहन चालक सामाजिक संघ, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, राजे छत्रपती संघटना,अंबिकानगर मित्र मंडळ,मनवीसे राहुरी फॅक्टरी, वाणी मळा मित्र मंडळ इतर सामाजिक संघटना यांनी सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला.