नगर (शिर्डी) :शिवसेना नेते एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड ( After The Revolt of Eknath Shinde ) पुकारल्यामुळे राज्य सरकार संकटात ( Political Crisis in Maharastra ) सापडले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारलं ( The MLAs called for a Revolt ) आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये चिड निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आमदारांचा निषेध करीत मोर्चेकाढले जाताहेत. शिर्डीतही आज शिवसैनिकांनी विराट मोर्चा काढत बंड आमदारांचा निषेध केला आहे.
शिवसैनिकांनी टायर जाळले : उत्तरनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज एकत्र येत शिर्डीतील शासकीय विश्रामग्रहापासून विराट मोर्चा काढला होता. हा मोर्चा शिर्डीतील नगरपंचायत समोर आला. यावेळी काही शिवसैनिकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना त्यांनी रोखले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काही काळ टायर पेटवण्यावरून झटापट झाली. दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसघांचे शिवसेनेचे खासदार सदशिव लोखंडे ( MP Sadashiv Lokhande ) यांनी मध्यस्ती करीत शिवसैनिकांना शांत केले आणि शिवसैनिकांनी आणलेले टायर पोलिसांनी जप्त केले आहे.