शिर्डी भारत पारतंत्र्यात असताना इंग्लडचे तत्कालीन राजे व भारताचे सम्राट असलेल्या जॉर्ज पंचम यांच्या निधनानंतर साईनगरी शिर्डीत समाधी मंदिरात कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच निधन झालेल्या इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ते आजोबा होते.
राणी एलीझाबेथच्या यांच्या आजोबांच्या निधनानंतर साईनगरी शिर्डीत झाले होते किर्तन - George pancham
भारत पारतंत्र्यात असताना इंग्लडचे तत्कालीन राजे व भारताचे सम्राट असलेल्या जॉर्ज पंचम यांच्या निधनानंतर साईनगरी शिर्डीत समाधी मंदिरात कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच निधन झालेल्या इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ते आजोबा होते.
जॉर्ज पंचम हे 6 मे 1910 ते 20 जानेवारी 1936 रोजी निधन होईपर्यंत इंग्लडचे राजे व भारताचे सम्राट होते. साईबाबांचे निर्वाण 1918 साली झाले तेव्हा जॉर्ज पंचम हे भारताचे सम्राट होते. त्यांच्याच कार्यकाळात 1922 साली साईबाबा संस्थानची स्थापना झाली होती. एलिझाबेथ द्वितीय या वडील इंग्लंडचे राजे झाल्यावर 1936 साली उत्तराधिकारी झाल्या होत्या. जॉर्ज पंचम यांच्या निधनाची वार्ता आठवडाभरात शिर्डीत पोहचली. त्यानंतर 28 जानेवारी 1936 रोजी साईबाबा संस्थानने जॉर्ज पंचम यांच्या निधनानिमीत्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
या निमीत्ताने शिर्डीत तिसऱ्या प्रहरी चार वाजता साई समाधी मंदिरात संस्थानचे गवई विठ्ठलराव मराठे यांचे किर्तन होवून जॉर्ज पंचम यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी संस्थानचे विश्वस्त तात्या गणपती कोते यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थीत होती़. तब्बल 86 वर्षापुर्वी साई संस्थानात घडलेल्या या घटनेला इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे उजाळा मिळाला आहे.