महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ - Ahmednagar District Latest News

शेतमालाची वाहतूक सुलभ व अल्पखर्चात व्हावी, यासाठी सरकारने देशात किसान रेल्वे सुरू केली आहे. मात्र आता किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे परराज्यात कसे पाठवणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद
किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद

By

Published : Mar 13, 2021, 9:15 PM IST

अहमदनगर -शेतमालाची वाहतूक सुलभ व अल्पखर्चात व्हावी, यासाठी सरकारने देशात किसान रेल्वे सुरू केली आहे. मात्र आता किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे परराज्यात कसे पाठवणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पालेभाज्या आणि फळांच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. शेतमाल परराज्यात पाठवण्यासाठी किसान रेल्वेकडून शेतकऱ्यांना भाड्यात 50 टक्के सूट मिळते. मात्र या रेल्वेतून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच माल अधिक जाऊ लागल्याने किसान रेल्वे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

सोलापूर रेल्वेस्थानकातून सुटते किसान रेल्वे

सोलापूर विभागातून बिहारकडे जाणाऱ्या किसान रेल्वेत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील माल कोपरगाव रेल्वे स्थानकावरून पाठवला जातो. मात्र आता किसान रेल्वेची अगाऊ बुकिंग बंद केली आहे. किसान रेल्वे सोलापूरवरून निघाल्यानंतर त्या रेल्वेमध्ये किती जागा शिल्लक आहे, हे कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांना कळणार आहे. आणि त्यानुसार कोपरगावमधून किसान रेल्वेत शेतमाल नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बुकिंगचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र एवढ्या कमी वेळात माल कसा आणायचा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

किसान रेल्वेची आगाऊ बुकिंग बंद

किसान रेल्वे फक्त सोलापूरमधील शेतकऱ्यांसाठीच आहे का?

किसान रेल्वे ही सोलापूरमधून निघते, मात्र सांगोला रेल्वेस्थानकामध्ये या रेल्वेत मोठ्या प्रमाणात माल भरला जातो. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल परराज्यात नेण्यासाठी या रेल्वेत जागा शिल्लक राहत नाही. तसेच किसान रेल्वेकडून सांगोल्यातून होणाऱ्या बुकिंगला प्राधान्य मिळत असल्याने, ही रेल्वे केवळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठीच आहे का? असा सवाल या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details