महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसने मुस्लिमांची मते वळविल्याने 'वंचित'ला फटका - अॅड. आंबेडकर - Rajender Trimukhe

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजाचा वापर फक्त मतासाठी केला. त्यांच्यासाठी त्यंनी काहीच योगदान दिले नाही. फक्त हिंदूंचे मत वंचित बहूजन आघाडील मिळाली आहेत, असे वक्तव्य वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

माध्यामांशी बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर

By

Published : Jun 1, 2019, 12:06 PM IST

अहमदनगर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजाचा वापर फक्त मतासाठी केला. त्यांच्यासाठी त्यंनी काहीच योगदान दिले नाही. तरीही त्यांनी ८० टक्के मुस्लिम मते स्वतःकडे वळविली. केवळ २० टक्के मते इतरत्र गेले असून फक्त हिंदूंचे मत वंचित बहूजन आघाडील मिळाली आहेत, असे वक्तव्य वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

माध्यामांशी बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे भेट दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरूण जाधव,गोपीचंद पडळकर, अविनाश शिंदे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

भाजपला हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, मुस्लीम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. तर मराठा समाजाची मते भाजप-सेना युतीकडे वळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांनी मुस्लीम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. त्यांच्यासाठी काही केले नाही त्यामुळे मुस्लीम आता वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details