महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासनाच्या आदेशानंतर होणार साई मंदिर दर्शनासाठी खुले; साई संस्थानचा मास्टर प्लान तयार - साई संस्थानचा मास्टर प्लान तयार

शिर्डीचे साईबाबा मंदिर 17 मार्चपासून भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यास जवळपास साडेतीन महिन्याचा काळ उलटला आहे. तर देवळात सवत्र अनलॉक प्रोसेस सुरु झाल्याने शिर्डीचे साईबाबा मंदिर कधी उघडणार याबाबत भक्तांकडून सारखी विचारणा होत आहे.

shirdi
साईबाबा

By

Published : Jul 4, 2020, 3:17 PM IST

Updated : Jul 4, 2020, 5:39 PM IST

शिर्डी- साईबाबा मंदिर कधी उघडणार याची आस भाविकांना लागली आहे. मात्र अद्याप शासनाचे मंदिर उघडण्याबाबत आदेश आलेले नाहीत. आदेश आल्यास भक्तांना दर्शन देण्याबाबतचा मास्टर प्लान साई संस्थानने तयार केला आहे. या प्लाननुसार एका दिवसात ३ हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मात्र भाविकांना जरा सबुरीनेच घ्यावे लागणार आहे.

शासनाच्या आदेशानंतर होणार साई मंदिर दर्शनासाठी खुले; साई संस्थानचा मास्टर प्लान तयार

कोरोनाचा वाढता प्रभाव बघता, शिर्डीचे साईबाबा मंदिर 17 मार्चपासून भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यास जवळपास साडेतीन महिन्याचा काळ उलटला आहे. तर देवळात सवत्र अनलॉक प्रोसेस सुरु झाल्याने शिर्डीचे साईबाबा मंदिर कधी उघडणार याबाबत भक्तांकडून सारखी विचारणा होत आहे. शिर्डीला मंदिरात येऊन दर्शनासाठी अनेक जण प्लान करत आहेत. मात्र भक्तांना साईंचा श्रद्धा आणि सबुरीचाच मंत्र अंगीकारावा लागत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. भक्तांना मंदिर दर्शनासाठी खुले केले गेले, तर दिवसभरात केवळ साडेतीन हजार भाविकच दर्शन घेऊ शकणार आहेत. त्याचे सगळे नियोजन साईबाबा संस्थान प्रशासनाने केल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

एरव्ही शिर्डीला पन्नास हजार भाविक येतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा दुप्पट होतो. आता कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि त्यानंतर शिर्डीला येऊन साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. मात्र भक्तांच्या दिवसभरातील दर्शन देण्याची संधी अत्यंत कमी असणार आहे. टाईम स्टॉलनुसारच दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना लगेच शिर्डीत गर्दी न करता जरा सबुरीनेच घ्यावे लागणार आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details