अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यात व शहरात सात दिवसाचे लॉकडाऊन करण्यासंदर्भात तहसील कार्यालयात स्थानिक प्रशासन, व्यापारी असोसिएशन व नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात सर्वानुमते सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याला दुजोरा देण्यात आला. त्यानुसार दि. १३ सप्टेंबरला रात्री बारा वाजल्यापासून ते २० सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत श्रीगोंदा शहरासह तालुक्यात लॉकडाऊन असणार आहे.
श्रीगोंद्यात सोमवारपासून पुढे सात दिवस जनता कर्फ्यू.. - shrigonda lockdown news
श्रीगोंदा तालुक्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला. या जनता कर्फ्यूसाठी श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे व्यापारी असोसिएशने स्थानिक प्रशासनाला बैठकीत सांगितले.सर्व नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी या बैठकीत नमुद केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील नेते, नागरिक, प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगरपालिका इत्यादी प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुख व श्रीगोंदा नगरपालिका सदस्य व्यापारी असोसिएशन सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकारांच्या उपस्थितीत एकत्र बैठक घेत श्रीगोंदा तालुक्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला. या जनता कर्फ्यूसाठी श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे व्यापारी असोसिएशने स्थानिक प्रशासनाला बैठकीत सांगितले.
सर्व नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी या बैठकीत नमुद केले आहे.
या बैठकीसाठी आमदार बबनराव पाचपुते, माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे,अप्पर तहसिलदार चारुशीला पवार,नायब तहसिलदार डॉ. योगिता ढोले, आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, प्रा. तुकाराम दरेकर, व्यापारी असोसिएशनचे सतीशशेठ पोखरणा, गौरव बोरा, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सोमवारपासून सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पाणी दूध वाटप होईल. मेडिकल, हॉस्पिटल सोडून बाकीची सर्व दुकाने बंद राहतील. सरकारी कार्यालये कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहतील. लॉकडाऊन चालू असताना ट्रिपल सीट आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिका प्रशासन आणि पोलिसांची करडी नजर असेल. विना मास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले आहे.