शिर्डी -साईबाबा संस्थानच्या वतीने व्दारकामाई मंदिराचे दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. साईबाबांच्या शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. शिर्डी येथे देश-विदेशातुन लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येत असतात.
Vdarkamai Temple Shirdi : साईबाबांच्या व्दारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल - शिर्डी व्दारकामाई मंदिर दर्शन वेळ
साईबाबांच्या शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. शिर्डी येथे देश-विदेशातुन लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येत असतात.
भाविक साईबाबांच्या समाधीसह व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरीता जातात. त्यातच बाबांनी त्यांच्या हयातीत संपूर्ण जीवन हे व्दारकामाई येथे व्यथीत केले. या ठिकाणाहुन बाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश, गोर-गरीबांची रुग्ण सेवा व अन्न दिले. तसेच याठिकाणी बाबांनी असंख्य भाविकांना आपल्या लिला ही दाखविले. त्यामुळे व्दारकामाईस अनन्य साधारण महत्व आहे. त्याअनुषंगाने संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -Muslim Artisans Ram Temple : मुस्लिम कारागिरांनी बनविली अयोध्येच्या राम मंदिराची चौकट