अहमदनगर - पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आलेल्या ७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. गुरुवारी रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अहमदनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढला; प्रशासन सतर्क - अहमदनगर कोरोना न्यूज
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आतापर्यंत एकूण १७९९ व्यक्तींचे घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १६९४ अहवाल निगेटिव्ह आले. तर ६० व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.
नगर शहरात कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासन सतर्क
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आतापर्यंत एकूण १७९९ व्यक्तींचे घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १६९४ अहवाल निगेटिव्ह आले. तर ६० व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. आता ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १३ रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये तर ३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.