अहमदनगर - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यातील जनतेशी, शेतकरी वर्गाशी आणि तरुणांशी होत असलेला संवाद महत्त्वाचा असून जनतेतून मिळणारे प्रेम ही शिवसैनिकांनी केलेल्या कामाची पुण्याई असल्याचे मत, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
जनआशीर्वाद यात्रा नगर जिल्ह्यात पोहोचली असून रात्री ही यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर इथे पोहचली. माझ्यासाठी पावसात लोक वाट पाहत आहेत, ही शिवसैनिकांची पुण्याई आहे असे सांगताना, पुढील सरकार हे भगवे सरकार असेल याचा आदित्य ठाकरेंनी पुनरुच्चार केला.