अहमदनगर - दुष्काळ, पाणी टंचाई, पिकाला मिळणारा कमी भाव, यातच डांळीब पिकाच्या मुळावर निमॅटोड रोगाने घाला घातल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी संकट कोसळले. डाळींब झाडाच्या मुळाशी तयार होणाऱ्या नॅमिटोड नावाच्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अदामा कंपनीने औषध तयार केले आहे. कृषी विद्यापिठ राहुरी आणि अदामा कंपनीने राहाता तालुक्यात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित करत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
निम्याटोडच्या नियंत्रणासाठी 'निमीट्ज' औषध तयार
निमॅटोड रोगामुळे डाळींबाच्या झाडाच्या मुळाशी गाठी तयार होतात. डाळींबाला दिले जाणारे खत पाणी हे निमॅटोड झाडाला मिळू देत नाही. त्यामुळे झाडाची वाढ आणि फळधारणा कमी होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भारतातील एकंदरीत नुकसानीचा आकडा एकवीस हजार कोटी रुपये इतका असल्याचे अदामा कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निम्याटोड रोग आणि त्यावरील उपाय 'निमीट्ज' या औषधाविषयीची माहिती देताना अदामा कंपनीचे अधिकारी व सरपंच मधुकर निर्मळ
अदामा कंपनीने या रोगावर सुत्रकृमीवर 'निमिट्ज' हे औषध तयार केले आहे. डाळींब झाडाच्या मुळाशी जिथे ठिबकने पाणी दिले जाते, त्याठिकाणी गोलाकार रिंगण करून हे औषध टाकल्यास निमॅटोडची वाढ बंद होते. झाडाला पोषक द्रव्य मिळाल्याने झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर फळेही येतात. त्यामुळे निमिट्ज हे औषध कसे काम करते? त्याचा उपयोग कसा करायचा? यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ आणि अदामा कंपनीने राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री या डाळींब उत्पादक असलेल्या गावात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता.
निमॅटोड हा डाळींबाच्या झाडासाठी कॅन्सर असून त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. निमॅटोड रोगाला मारणारं हे औषध नसुन शेतकर्यांसाठी वरदान असल्याचं गावचे सरपंच आणि प्रगतशील शेतकरी मधुकर निर्मळ म्हणाले.