शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी साईबाबा माझाकडून काही घेवुन गेले आणि त्यांनी काही दिले पण अशा भावना अभिनेत्री रविना टंडनने शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाले की, मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात माझा वडिलांचे निधन झाले आणि आज शिर्डी साईबाबांना विचारण्यासाठी आले होते की माझे वडील तुमच्या सोबत आहे ना. आज शिर्डी साईबाबांनाच्या माध्यान आरतीला उपस्थित राहता आल्याने मनला खूप समाधान मिळाले असल्याचे यावेळी अभिनेत्री रविना टंडन यांनी सांगितले.
रवीना टंडन साईंच्या दरबारी : शिर्डी साईबाबांना मी कधीच काही मागत नाही तर साईबाबा न मागताच मला सगळे देत असतात. यामुळे मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आज शिर्डीला आली असल्याचे अभिनेत्री रविना टंडन म्हणाल्या. मी लहानपणापासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. माझी मुलगी 12 वीत शिकत आहे. तिचे पेपर सुरू होणार असल्याने ती शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येवु शकली नाही. मी तिच्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही रविना यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.