महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन - महेश बाबू साईबाबा दर्शन

चित्रपटांच्या यशासाठी अनेक सिनेकलाकार साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही साईंचे दर्शन घेण्यासाठी कलाकारांनी रीघ लावली आहे. मागील आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते.

saibaba darshan
अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन

By

Published : Dec 31, 2019, 8:27 AM IST

Updated : Dec 31, 2019, 10:13 AM IST

शिर्डी- सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त शिर्डीत येत असतात. यात बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील कलाकारांचा देखील समावेश आहे. सोनू सूद याने आपल्या कुटुंबीयांसह साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजालाही चांगले दिवस यावेत, अशी मनोकामना साईचरणी केली आहे.

अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन

हेही वाचा -फिजिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स विषयाची पुनर्परीक्षा १४ जानेवारी रोजी

चित्रपटांच्या यशासाठी अनेक सिनेकलाकार साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही साईंचे दर्शन घेण्यासाठी कलाकारांनी रीघ लावली आहे. मागील आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते. तसेच दक्षिणीचे स्टार मोहन बाबू आणि त्यांची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतले.

साईभक्त असलेल्या सोनू सूदचेही नवीन वर्षात महत्त्वाचे चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे आज सरत्या वर्षाच्या एक दिवस आधी त्याने साईदरबारी हजेरी लावली आहे. सोनू सूदचा 'पृथ्वीराज' आणि होम प्रोडाक्शनचा 'सिंधू' चित्रपट येत आहे. त्याच्या यशाची कामना सोनू सूद याने केली आहे. आपल्या कुटुंबीय, मित्रांसह देशातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस यावेत, त्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागू नये, अशी प्रार्थनाही त्याने साईबाबांकडे केली आहे.

Last Updated : Dec 31, 2019, 10:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details