महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Actor Sonu Sood : माणसातला देव, शिर्डीतील 11 वर्षाचा जान्हवीच्या मदतीसाठी सोनू सूद आला पुढे - Sonu Sood Help Janhvi

शिर्डीतील जान्हवी बावळे या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेता सोनू सुदने यासाठी मदत ( Sonu Sood help ) केली आहे. याबाबत तिच्या पालकांनी सोनु सूदचे आभार मानले आहेत.

Actor Sonu Sood Help Janhvi
Actor Sonu Sood Help Janhvi

By

Published : Jan 9, 2022, 6:14 PM IST

शिर्डी - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ( Actor Sonu Sood Help ) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शेकडो नागरिकांना मदत केली. तसेच, त्याने अन्य गरजूंना मदतही केली होती. मध्यंतरी सोनूने नागरिकांना सांगितले होते की तो पुन्हा एकदा लोकांची मदत करण्यास तयार आहे. आता आता कोपरगाव तालुक्यातील 11 वर्षीय जान्हवी वाबळे या व्याधीग्रस्त बालिकेला सोनू सुदने मदत ( Sonu Sood Help Janhvi ) केली आहे. सोनू सुदने तिला उपचारासाठी आर्थिक मदत केल्याने पुण्यातील रुग्णालयात जान्हवीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अभिनेता सोनू सूद साई दर्शनासाठी शिर्डीत ( Sonu Sood in Shirdi ) येत असतो. ऑक्टोबर 2021 मध्ये तो साई दर्शनाला आला होता. तेव्हा त्याने शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच गरजवंतांना वैद्यकीय मदत करण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांनी जान्हवीचे वडील शशिकांत वाबळे आणि सोनू सुद यांची भेट घडवून आणली. यावेळी शशिकांत वाबळे यांनी जान्हवीची सर्व परिस्थिती सांगितली.

शेतकरी असल्याने येत होती अडचण....

पुण्यातील संचेती रुग्णालयात जान्हवीवर शस्त्रक्रिया करण्याचा तिच्या वडिलांचा विचार होता. मात्र, त्यासाठी मोठा खर्च येणार होता. शेतकरी असलेल्या शशिकांत वाबळे यांची तो खर्च उचलण्याची ताकद नव्हती. त्यांची ही व्यथा त्यांनी सोनू सुद कडे मांडली. त्यानंतर सोनु सुदने तात्काळ शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली.

जान्हवी बावळेचे आई वडीलांना मानले सोनु सूदचे आभार

...आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली

डिसेंबर महिन्यात पुण्यातील संचेती रुग्णालयात डॉ. मयूर कर्डिले यांनी जान्हवी हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आज जान्हवी व्याधीमुक्त झाली आहे. सोनू सुदने केलेल्या मदतीबद्दल जान्हवीची आई मनीषा आणि वडील शशिकांत वाबळे यांनी त्याचे आभार मानले आहे.

हेही वाचा -Heavy Rain Amravati : ...अन् शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले मंत्री बच्चू कडू

ABOUT THE AUTHOR

...view details