अहमदनगर -औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या आणि नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येत असलेल्या विविध कंपन्यांवर टाळे ठोकण्याची धडक कारवाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. अहमदनगर शहराजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये आणि नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काही कंपन्यांचा मालमत्ता कर थकीत आहे. वारंवार सुचना देऊनही मालमत्ता कर न भरल्याने अखेर कंपनीवर कारवाई म्हणून प्रशासनाने टाळे लावले आहे.
अहमदनगर : दोन कोटींचा 'मालमत्ता कर' थकीत ; MIDC मधील कंपन्यांवर कारवाई सुरू - नवनागापूर ग्रामपंचायत अहमदनगर
अहमदनगर शहराजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये आणि नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काही कंपन्यांचा मालमत्ता कर थकीत आहे. वारंवार सुचना देऊनही मालमत्ता कर न भरल्याने अखेर कंपनीवर कारवाई म्हणून प्रशासनाने टाळे लावले आहे.
हेही वाचा...बापरे...! कोरोनामुळे बंदी असताना एसडीएफ शाळेने घेतली नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कारखान्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नवनागापूर ग्रामपंचायत अंतर्गत एमआयडीसीमधील जवळपास 36 कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा एक कोटी 98 लाख 27 हजार रुपयांचा मालमत्ता कर थकवलेला आहे. ग्रामपंचायतीने एक वर्षांपासून या सर्व कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. मात्र, जप्तीच्या नोटिसा बजावूनही कारखानदारांनी पैसे न भरल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत गटविकास अधिकारी संजय केदारे, सरपंच सुशीला जगताप आदींनी सहभाग घेतला. कारवाईवेळी पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.