शिर्डी (अहमदनगर) Rapist Arrested In Shirdi : पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी पती विरुद्ध तक्रार दिली होती. (Shirdi Sai park) पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादंवि कलम 376 /2 आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता. (father rape On daughter)
फिरून शिर्डीत शरण : गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान, गुजरात आणि बंगळुरु येथे फिरला. अखेर त्यानं महाराष्ट्रात परतत साईबाबांच्या शिर्डीत आश्रय घेतला. साईबाबा संस्थानच्या साई उद्यान इमारतीत गेल्या 26 डिसेंबरपासून एक लॉकर भाड्याने घेत आरोपी राहत होता. मात्र, गुरुवारी लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता. त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं साई उद्यान इमारत प्रमुखांनी साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली.
मोबाईलमुळे फुटले बिंग : अधिकारी आपल्या सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीकडे असलेली बॅग चेक केली गेली. यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आढळून आला. या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पत्नीने घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी या आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी या आरोपीबाबद पुणे वानवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला असल्याचं आरोपीबाबत निष्पन्न झालंय.