अहमदनगर - देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे. हैदराबाद घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करून पळून जात होते. त्या परिस्थितीत त्यांचे झालेले एन्काऊंटर योग्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
हैदराबाद येथील एका पशुवैद्यक महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काऊंटर झाले. सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काऊंटर करणेच योग्य आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही, असे अण्णा हजारे म्हणाले.