अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील माहुली शिवारात एका जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. राहुल अण्णासाहेब राहणे (वय २८) असे मृत जवानाचे नाव आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राहुल यांच्या दुचाकीला अपघात झाला. जवान यांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी राहुल यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संगमनेरच्या जवानाचा अपघाती मृत्यू; दिवाळी सुट्टीसाठी आल्यावर घडली घटना - accidental death of Sangamner's Jawan
चंदनापुरी (आनंदवाडी) येथील रहिवासी असलेले जवान राहुल राहणे हे सैन्य दलात मराठा रेजिमेंटमध्ये काश्मिरच्या उरी येथे कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. शनिवारी दुपारी अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील नातेवाईकांची भेट घेऊन आनंदवाडीकडे निघाले असताना माहुली फाट्यानजीक त्यांचा अपघात झाला. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी राहपल यांचे लग्न झाले होते.
हेही वाचा -अहमदनगर : एमआयआरसीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 185 जवान देशसेवेत दाखल
चंदनापुरी (आनंदवाडी) येथील रहिवासी असलेले जवान राहुल राहणे हे सैन्य दलात मराठा रेजिमेंटमध्ये काश्मिरच्या उरी येथे कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. शनिवारी दुपारी अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील नातेवाईकांची भेट घेऊन आनंदवाडीकडे निघाले असताना माहुली फाट्यानजीक झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आनंदवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.