Car Accident: मोहटादेवीवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला अपघात; दोन भक्तांचा जागीच मृत्यू - Accident to car
मोहटादेवीवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भक्तांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर ही घटना घडली आहे.
![Car Accident: मोहटादेवीवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला अपघात; दोन भक्तांचा जागीच मृत्यू मोहटादेवीवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला अपघात;](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16525877-792-16525877-1664617692949.jpg)
अहमदनगर -मोहटादेवीवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भक्तांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. मारुती अल्टो कार मधील भाविक हे त्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव या ठिकाणी देवीचे दर्शन घेऊन जाताना अमरापुरकडून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने अल्टो कारला समोरून जोरदार धडक दिली या धडकेत अल्टो कारमधील अप्पासाहेब गावंडे. गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे. हे दोघेजण जागीच ठार झाले. तर भक्ती झिंजूर्डे वय ९ माधुरी गणेश झिंजुर्डे अमोल झिंजूर्डे, गणेश झिंजूर्डे तेजेस गणेश झिंजूर्डे वय दीड वर्ष हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
TAGGED:
Accident to car