अहमदनगर - नाशिकहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येत असलेल्या भाविकांना भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना शिर्डी साईबाबा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले; एकाचा मृत्यू, 5 जखमी - शिर्डीच्या बातम्या
नाशिकहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येत असलेल्या भाविकांना भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.
नाशिक येथील भद्रकाली येथून गेल्या 12 वर्षांपासून 'खालसा ग्रुप' शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येतात. यंदाचे 13 वे वर्ष असून ही साई भक्तांची पालखी शिर्डी परिसरात आली असताना पाठीमागून भरधाव आलेल्या महिंद्रा मॅक्स गाडीने (एमएच १५ बीएन २८०२) भाविकांना जोराची धडक दिली.
यात कलानी रहोती सिंग (वय 18) याचा जागीच मृत्यू झाला तर टाकफेते सिंग (वय 19) हा गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. भाविकांना धडक देऊन गाडी चालक गाडी घेऊन फरार होत असताना पालखीतील काही भक्तांनी गाडी चालकाला पकडून जखमींना गाडीत घालून शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालक आणि वाहन शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.