औरंगाबाद - मद्यपान करून घरी आलेल्या 30 वर्षीय तरुणाने रागाच्या भरात पेट्रोल अंगावर ओतून घेतल्याची घटना 20 मे रोजी देवळाई परिसरात घडली होती. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रागाच्या भरात पेट्रोल ओतून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - aurangabad youth suicide news
रामेश्वर हा सेंटरिंगचे काम करत होता. २० मे रोजी रामेश्वर नियमितपणे मद्यपान करून यावेळी त्याने स्वतःच्या गाडीतून पेट्रोल काढत अंगावर ओतून घेत पेटून घेतले. यामध्ये तो भाजला गेला. हा प्रकार लक्षात येताच त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना सोमवार (दि. ३१) त्याचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण
रामेश्वर बबनराव साखरे (वय 30) रा. देवळाई चौक, जुना म्हाढा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामेश्वर हा सेंटरिंगचे काम करत होता. आठ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन मुले आहेत. २० मे रोजी रामेश्वर नियमितपणे मद्यपान करून घरी आला. पत्नीला अंडे आणण्यासाठी दुकानात पाठवले. यावेळी स्वतःच्या गाडीतून पेट्रोल काढत अंगावर ओतून घेत पेटून घेतले. यामध्ये रामेश्वर भाजला गेला. हा प्रकार लक्षात येताच त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना सोमवार (दि. ३१) त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा- आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगीही आता केंद्राने बघायची का? - चंद्रकांत पाटील