अहमदनगर -पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेवर गोळीबार झाला असून या गोळीबारात महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमके कोणत्या कारणातून ही घटना घडली ही माहिती अद्याप समोर आली नाही.
अहमदनगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; महिलेची तीन गोळ्या झाडून हत्या - पारनरे गोळीबार हत्या
पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान दोन तरुणांनी सविता सुनील गायकवाड (वय-35) या महिलेवर तीन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
![अहमदनगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; महिलेची तीन गोळ्या झाडून हत्या firing in parner](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6109808-thumbnail-3x2-par.jpg)
हेही वाचा -बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, नांदेडमध्ये भरदिवसा 30 लाख लंपास
सविता सुनील गायकवाड (वय-35) असे या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव असून आरोपींनी तीन गोळ्या झाडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादात एका तरुणाने स्वतःकडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघे आरोपी पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पारनेर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.