अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत आंदोलने सुरू झाली आहेत. यात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरून आता चांगलाच संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकोल्यातील कोल्हार घोटी रस्ता इंदोरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी तब्बल १८२ गावातील नागरिकांचे आंदोलन - street protest
आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकोल्यातील कोल्हार घोटी रस्ता इंदोरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल 182 गावातील नागरीकांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या मुखा जवळील कासव्यांची कामे सुरु करा, अशी मागणी घेवुन गेल्या आठवड्यात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
गेल्या चाळीस वर्षापासुन निळवंडे धरणाचे पाणी आपल्या शेत शिवारात येईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगुन आहेत. तब्बल 182 गावातील नागरीकांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या मुखा जवळील कासव्यांची कामे सुरु करा, अशी मागणी घेवुन गेल्या आठवड्यात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हार घोटी रस्ता इंदोरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी जमिनी संपादित होऊन आता अनेक वर्षे उलटली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची परीस्थिती बदलली असून कालवे भुमिगत करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या सोबतच काळेवाडी आणि खिळपाट पाझर तलावाचे कामे, रस्त्यांची कामे, गावांच्या पाणी योजनांचे सर्व्हेक्षण आणि पुलांची रखडलेली कामे मार्गी लावावेत, या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.