संगमनेर -संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती येथे एक दिवसाचं पुरुष जातीचं जिवंत अर्भक सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती जवळील काटवनात एक दिवसाचं अर्भक परिसरातील नागरिकांना आढळून आले. त्यांनी तत्काळ गावचे पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांना याची माहिती दिली. त्यांनी ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना कळवली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सुभाष बोडखे, राजेंद्र डोगरे, महिला पोलीस वनिता चोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अर्भक ताब्यात घेतले.
एक दिवसाच्या अर्भकाला काटेरी झुडपात फेकले, गुन्हा दाखल - Sangamner Latest News
संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती येथे एक दिवसाचं पुरुष जातीचं जिवंत अर्भक सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे अर्भक ताब्यात घेतले आहे.
एक दिवसाच्या अर्भकाला काटेरी झुडपात फेकले
अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल
सध्या या बालकावर संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या बालकाच्या मातेचा शोध पोलिसांकडून सुरू असून, याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.