महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रक्षाबंधन करून सासरी जात होती नवविवाहिता, अपघातात झाला मृत्यू - Nagar Manmad Highway Priyanka Salunke Accident

सासरी जाणाऱ्या नवविवाहितेचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर घडली.

Nagar Manmad Highway Priyanka Salunke Accident
प्रियंका साळुंके अपघात कोपरगाव

By

Published : Aug 24, 2021, 9:49 PM IST

अहमदनगर -सासरी जाणाऱ्या नवविवाहितेचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर घडली.

हेही वाचा -अण्णा हजारेंनी तुकाराम मुंढेंसारखं न घाबरता काम करण्याचा सल्ला दिला - तहसीलदार ज्योती देवरे

मूळ कोपरगाव येथील नवविवाहिता प्रियंका सचिन साळुंके हीचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होत. पहिल्याच रक्षाबंधनाच्या सनाला ती माहेरी आली होती. आज ती भावासोबत दुचाकीने सासरी जात होती. दरम्यान नगर - मनमाड महामार्गावर असलेल्या मोठ्या पुलावर दुचाकी आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात प्रियंकाचा मृत्यू झाला.

शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी प्रियंका व तिच्या भावाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रियंकाला मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -बदनामीच्या त्रासाने मुलाच्या आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details