महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sai Baba Darshan: साईबाबांच्या दर्शनाने नववर्षाची सुरूवात; भाविकांची मोठी गर्दी - मंदिर दर्शनासाठी बंद

साईबाबांच्या दर्शनाने (Darshan of Sai Baba) नवीन वर्षाची सुरवात (beginning of the new year) करण्यासाठी साई मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. काल रात्री 9 वाजता साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद (temple Closed for darshan) करण्यात आले होते. आज सकाळ पासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. रात्री बाराच्या ठोक्याला अनेक भाविकांनी मंदीराच्या कळसाच दर्शन घेत नवीन वर्षाचे स्वागत केले.

Sai baba
नवीन वर्षाचे स्वागत

By

Published : Jan 1, 2022, 9:53 AM IST

Updated : Jan 1, 2022, 10:32 AM IST

शिर्डी: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त 31 डिसेंबरला साईबाबांचे मंदिर दरवर्षी दर्शनासाठी खुले ठेवण्यात येतें. मात्र यंदा कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रात्रीची जमावबंदी लागु असल्याने साईबाबा दर्शनातही साई संस्थानकडून बदल करण्यात आलेले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे काल रात्रीही मंदीर बंद करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी 6 वाजे पासुन भक्तांना मंदीरात प्रवेश दिला जातोय.लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत

साईबाबा मंदिर खुले झाल्यानंतर नवीन वर्षातील पहीले दर्शन मिळावे यासाठी रात्री 2 वाजे पासुनच भाविकांनी बायोमेट्रिक तसेच व्हीव्हीआयपी दर्शन पास घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. साई संस्थानने ठिकाठिकाणी भक्तांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देणार फलक लावले आहेत. बेंगलोर येथील साईभक्त श्री.बी.ए.बसवराजा यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली. तर शनि शिंगनापुर येथील गणेश शेटे, शनेश्वर डेकोरेटर्स यांच्यावतीने देणगीस्वरुपात मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे. साईच्या मूर्तीला काही कोटींची आभूषण सुवर्ण दागीने घालण्यात आली आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाची सुरवात साई दर्शनाने भाविकांनी केली. देशावर आणि जगावर आलेले कोरोना संकट दूर व्हावे यासाठी भाविकांनी सबका मालिक एकचा महामंत्र देण्याऱ्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय. आज वर्षाच्या पहील्याच दिवशी पहाटे शिर्डीकडे येणार्या रस्त्यावर आणि शिर्डीच मोठ्या प्रमाणात धुके पडले होत या धुक्याचा आनंदही साईभक्तांनी घेतला.

नवीन वर्षाचे स्वागत


साईबाबा मंदिर परिसरात रात्रीची जमावबंदी असतांनाही साई मंदीराचे दुवरुवन का होईना पण रात्री बाराच्या ठोक्याला भाविकांनी मंदीराच्या कळसाचे दर्शन घेतले. रात्री शिर्डीतील रस्त्यावर होणारी गर्दी पोलीसांनी पांगवली, पोलीसांचा चोख बंदोबस्त आणि वारंवार सुचना करुनही साईमंदीराच्या कळस ज्या ज्या बाजुने दिसेल तेथे काही भाविक जमले होते. रात्री बारा वाजताच हात वर करत साईनामाचा गजर करत कळसाच दर्शन घेवुन भाविकांनी 2022 या नवीन वर्षाचे स्वागत केले आणि सरत्या 2021 ला निरोप दिला.

Last Updated : Jan 1, 2022, 10:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details