अहमदनगर- जिल्ह्यासह नगर शहरात आज (शनिवारी) दुपारी 3 नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका धावत्या बसवर झाड कोसळले. मात्र, सुदैवाने या झाडाच्या शेंड्याचा भाग बसच्या टपावर पडल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील नटराज हॉटेल समोर हा प्रकार घडला.
अहमदनगरमध्ये बसवर कोसळले झाड; जीवितहानी नाही - कोसळले
पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका धावत्या बसवर झाड कोसळले.
अहमदनगरमध्ये बसवर कोसळले झाड, सुदैवाने टळली जीवीतहानी
स्थानिक नागरिकांनी बसवर पडलेले झाड बाजूला केले. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. तर अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाकडून अडचणीच्या ठिकाणी मदत पोहचविण्यात येत आहे.