महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाची सुरुवात साईदर्शनाने करण्याकरता शिर्डीत भाविकांची गर्दी

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आज संध्याकाळी साई दर्शनासाठी येणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत देश-विदेशातून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत.

शिर्डीत भाविकांची गर्दी
शिर्डीत भाविकांची गर्दी

By

Published : Dec 31, 2020, 3:59 PM IST

Updated : Dec 31, 2020, 4:43 PM IST

शिर्डी (अहमदनगर)-शिर्डीत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरवात साईदर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत. साईमंदीराला आकर्षक विद्युत दिव्यांची आणि फुलांची रोषणाई करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आज संध्याकाळी साई दर्शनासाठी येणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत देश-विदेशातून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत. साईंचे मंदिरही आज रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. आज दुपारपर्यंत सुमारे 12 हजार भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळत साईंचे दर्शन घेतले आहे.

साईंचे मंदिरही आज रात्रभर खुले

हेही वाचा-फ्लिपकार्टसह अ‌ॅमेझॉनवर कारवाईचे ई़डीला केंद्राकडून आदेश

मंदिर परिसरात सजावट-

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईंचे मंदिर आणि परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले आहे. साईंमंदिराचा गाभारा, द्वारकामाई चावडी परिसरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने विशेष काळजी घेण्यात आल्याचे संस्‍थान मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले. साईदर्शन झाल्यानंतर भाविक थेट मंदिराबाहेर निघतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

साईमंदिरात फुलांची सजावट

हेही वाचा-नववर्षाच्या उंबरठ्यावर जिओची भेट; सर्व नेटवर्क कॉलिंग मोफत!

शहरातील वाहतुकीत बदल-

दरम्यान, शहरातील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पोलीस प्रशासनास सज्ज झाले असून नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक रिंगरोडने वळविण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषात नववर्षाच्या स्वागताची तयारी साईबाबा संस्थानकडून करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details