अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील आंबी-खालसा फाट्याजवळ कंटेनर दुभाजकावर चढल्याने तो महामार्गावरच आडवा झाला. त्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पर्यायी व्यवस्था म्हणून सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू करण्यात आल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूकही मंदावली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनरला अपघात; वाहतूक खोळंबली - वाहतूक मंदावली
पुणे-नाशिक महामार्गावरील आंबी-खालसा फाट्याजवळ कंटेनरचा लांबलचक भाग आडवा झाला. वाहतुक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजूला हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कंटेनर आडवा झाला
नाशिकहून-पुण्याकडे जाणारा कंटेनर दुभाजकावर चढल्याने आडवा झाला
आंबी खालसा शिवारात महामार्गावर सकाळच्या सुमारास एक कंटनेर नाशिकहून-पुण्याकडे जात होता. मात्र, अचानक कंटेनर दुभाजकावर चढल्याने तो महामार्गावरच आडवा झाला. त्यामुळे तब्बल महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर एका बाजूला हलविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आणखी काही काळ वाहतूक विस्कळीत राहणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.