अहमदनगर - शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज(सोमवार) सकाळच्या सुमारास कोठला परिसरातून पिस्तुलाच्या धाकाने सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. ४ ते ५ जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळवून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अहमदनगरचे उद्योजक करीमभाईंचे अपहरण करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी आज सकाळी घराबाहेर पडले. ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच ४ ते ५ जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घातले. त्यानंतर ती गाडी भरधाव वेगात निघून गेली. हा प्रकार कोठला परिसरात राहणाऱ्या काही महिलांनी प्रत्यक्ष पाहिला आहे.
हेही वाचा -शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट; विकासातील व्यथांचा वाचला पाढा
हुंडेकरी हे वाहनविक्री, हॉटेलिंग, लॉन्स-मंगलकार्यालय व्यवसायात मोठे नाव असून त्यांचा सामाजिक कार्यात पण सहभाग असतो. त्यंच्या अपहरणाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांची विविध पथके हुंडेकरी यांचा शोध घेत असून जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा -कंटेनरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू, अहमदनगर- सोलापूर रोडवरील घटना