अहमदनगर -2018 साली शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शानासाठी आलेल्यां भाविकांमधून 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका साई भक्ताने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी गायब झालेल्या लोकांची मानवी तस्करी अथवा मानवी अवयवासाठी तस्करी झाली का? याचा तपास करण्याचे आदेश दिले. तर शिर्डीतील ग्रामस्थांनी भाविक गायब होण्याच्या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पोलीस प्रशासन आणि साई संस्थानने याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये इंदौर येथील साईभक्त सोनी आपल्या पत्नी आणि मुलांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर सोनी संस्थानच्या प्रसादलयात भोजन करुन बाहेर आले. त्यावेळी त्यांची पत्नी तिथून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, यानंतरही पत्नीचा शोध लागला नसल्याने सोनी यांनी माहिती अधिकाराचा आधार घेतला. यानंतर 10 महिन्यात 88 व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हेही वाचा -भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...